Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भरधाव ट्रकच्या धडकेत हिरापुर येथील बबन आत्राम यांचा मृत्यू #chandrapur #Korpana


५ तास चक्का जाम केल्यानंतर मृतकाच्या नातेवाईकांना आर्थिक मदत
कोरपना:- कोरपना तालुक्यातील आवाळपुर - हिरापुर राज्य मार्गावर ट्रक क्रमांक एमएच ३४ बिसी ९०५४ ने हिरापुर येथील बबन गोविंदा आत्राम वय ६५ वर्ष यांना धडक दिली असता ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राज्य मार्ग अडवत ट्रक मालकाला मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली,परंतु ट्रक मालक हा वेळकाढूपणाचे धोरण करत होता,त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सदर घटनेची भ्रमनध्वनीद्वारे माहिती दिली सदर घेटनेची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी यांना त्यांनी सदर प्रकरणात मध्यस्ती करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले.त्यानंतर ट्रक मालकाने ५ तास चक्का जाम केल्यानंतर मृतकाच्या कुटुंबियाला ५० हजार आर्थिक मदत दिली.
यावेळी भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,माजी सरपंच प्रमोद कोडापे,उपसरपंच अरुण काळे,विशाल पावडे,योगेश डाहुले, तनवीर शेख,साजिद उमरे,भास्कर विधाते,समशेर शेख,कुलदीप पडवेकर,विशाल कोडापे,गंगाधर मडावी,सोमेश्वर जोगी,विलास कोडापे,सचिन बोढे,दुर्योधन सिडाम उपस्थित होते,
घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सत्यजित आमले व पोलिस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत