Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

वृद्ध आजी आजोबांचा आनंद द्विगुणित करण्याचा भाजपा राजुरा शहर महिला आघाडीचा प्रयत्न- अल्का आत्राम, जिल्हाध्यक्षा

वृद्ध आजी आजोबांचा आनंद द्विगुणित करण्याचा भाजपा राजुरा शहर महिला आघाडीचा प्रयत्न- अल्का आत्राम, जिल्हाध्यक्षा


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आज भाजपा महिला आघाडी राजुरा शहर यांचे वतीने वृद्धाश्रमात  असलेल्या आजी आजोबा सोबत दिवाळी आनंद साजरा करण्यात आला. घरोघरी दिवाळीत फराळाचा आस्वाद घेत आपल्या आप्तस्वकीय सोबत असतात. परंतु काहीचे नशिबी हे सुख नसते..म्हणून  मातोश्री वृध्दाश्रम येथे भाजपा महिला राजुरा शहर आघाडीच्या वतीने फराळ वाटप करीत त्यांचे सुख दुःख जाणून घेतले. व येणारा थंडीचा महिना बघता ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. तसेच आजी आजोबा सोबत दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू यावं दिवाळीचा आनंद त्यांना थोडा का होईना मिळावा म्हणून महिलांनी प्रयत्न केला. 


यावेळी अल्काताई आत्राम जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी चंद्रपूर, सुलभा पीपरे नगराध्यक्ष पोंभुर्णा, उज्ज्वला जयपूरकर माजी नगरसेविका, शुभांगी रागीट, शीतल वाटेकर, प्रियदर्शनी उमारे, स्वरूपा झंवर, अल्का गांगशेट्टीवर, सीमा देशकर, पायल येरणे, मीराबाई जयपूरकर, अर्चना भटरकार, माधुरी भटरकार, शोभा भटारकर वैशाली पिपरवार इत्यादी  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत