"उत्कृष्ठ शैक्षणिक संस्था पुरस्काराने" राजुऱ्याची आदर्श प्राथमिक व आदर्श हायस्कूल सन्मानित.

Bhairav Diwase
0
"उत्कृष्ठ शैक्षणिक संस्था पुरस्काराने" राजुऱ्याची आदर्श प्राथमिक व आदर्श हायस्कूल सन्मानित.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- 1999 मध्ये अस्तित्वात आलेली व आज बालवाडी ते 10 वी पर्यंत उत्कृष्ट शिक्षण देणारी तसेच  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी " बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ " ची ' आदर्श प्राथमिक व आदर्श हायस्कूल राजूऱ्याला'  जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारा सण 2022 च्या " उत्कृष्ठ शैक्षणिक संस्था पुरस्काराने"  सन्मानित करण्यात आला.
आपल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरातील, कार्यक्षेत्रात उत्कृष्ठ प्रदर्शनामुळेच, महात्मा गांधी जयंती निमित्त दिनांक 2 ऑक्टोबर ला  पी. डब्लू. डी. हॉल  बल्लारशा येथे आयोजित सोहळ्यात , अंचल अध्यक्ष सौरभ बर्डिया, पूर्व अंचल अध्यक्ष  अनूप गांधी, बल्लारपूर च्या प्रख्यात डॉ. रजनी हज़ारे , झोन डायरेक्टर प्रोग्रॅम सुष्मा शुक्ला, जेसीआय राजुरा रॉयल्स च्या अध्यक्ष सुशीला पुरेड्डीवार, सचिव मधुस्मिता पाढ़ी, पूर्व अध्यक्ष स्मृति व्यवहारे आणि जोन Xlll च्या जेसीआई राजुरा रॉयल्स च्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत  प्रदान करण्यात आला. 
   जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारे आदर्श शिक्षक सत्कार कार्यक्रमात यावर्षी एक नवीन परंपरे ची सुरुवात करताना, "उत्कृष्ट शैक्षणिक संस्था" या पुरस्काराची सुरुवात यावर्षीपासून करावी असा संकल्प घेतला व " सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था"  म्हणून " बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ"  च्या " आदर्श प्राथमिक व आदर्श हायस्कूल राजुरा"  याची निवड करून संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे, आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यपिका निलिनी पिंगे, आणि आदर्श हायस्कूल चे मुख्यध्यापक जांभुलकर यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, अंगवस्त्र आणि पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आला.
          गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय निर्माण व्हावी यासाठी अतिशय मागास भागात, विद्यादानासोबतच सुसंस्कार रुजणारी शाळा म्हणून आज आदर्श मराठी उच्च प्राथमिक शाळा, आदर्श हायस्कुल व आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर या  बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित शाळाची ख्याती आहे. परिसरातील शेकडो विद्यार्थी प्राथमिक शिक्षणासाठी येथे दाखल होतात. या संस्थेच्या मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे व इतर संचालक मनोहर साबनानी, भास्कर येसेकर,  शंकरराव काकडे, प्रकाश बेजंकिंवार,  मधुकरराव जानवे, अविनाश निवलकर, लक्ष्मणराव खडसे, मंगला माकोडे  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिदिन उत्तम प्रगती साधत आहे.
              विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात.  कला,  क्रीडा,  सांस्कृतिक,  विज्ञान,  व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून येथील बालमनावर संस्कार रुजविण्याचे काम या विद्यालयातून केले जात आहे. सामाजिक वनिकरण विभाग द्वारा संचालित राष्ट्रीय हरीत सेना (इको क्लब ) च्या माध्यमातून पर्यावरण पूरक उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात येते.  शिष्यवृत्ती परीक्षेत व जवाहर नवोदय परीक्षेत दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होतात. स्काऊट -गाईड युनिटच्या माध्यमातून देशप्रेम, देशसेवा, पर्यावरणरक्षण, शारीरिक क्षमतेचा विकास आणी बालवयातच स्पर्धापरीक्षेची तयारी व्हावी यासाठी विशेष वर्ग घेऊन मार्गदर्शन करण्यात येते. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विध्यार्थीना प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते. विस्तीर्ण पटांगण, प्रशस्त इमारत,  शिस्तप्रिय वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये  मिसळून शिक्षण देणारे शिक्षकवृंद यामुळे येथील वातावरण उल्हासमय, प्रफुल्लित, आनंददायी आहे. बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे यांच्या नेतृत्वात आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे,  आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक दिपक सातपुते यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक बादल बेले, रुपेश चिडे, ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे,  वैशाली टिपले,  सुनीता कोरडे, जयश्री धोटे, अर्चना मारोटकर, बंडू बोढे, दिपक मडावी, सोनल नक्षीणे यांच्या सहकार्यातून विद्यालयाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. विध्यार्थी -पालक -शिक्षक अश्या त्री सूत्रीचा वापर करून शाळेच्या प्रगतीची वाटचाल होत आहे. या पुरस्कारामुळे कार्य कंरण्याची नवीन ऊर्जा नक्कीच मिळेल, असा या संस्थेच्या पूर्ण विश्वास आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)