क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलवाडी वणी येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त "वाचन प्रेरणा दिवस" साजरा #chandrapur

Bhairav Diwase
0
वणी:- वणी येथील नामांकित अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलवाडी वणी येथे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ हा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा केला जातो. त्यादिनानिमित्य वाचनालयात "वाचन मॅराथॉन स्पर्धा" चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांनी वाचनालयातील आवडत्या पुस्तकाचे संपुर्ण वाचन करून, त्यातील ठळक बाबींची नोंद किंवा अभिप्राय लिहून काढून स्पर्धकांनी त्यांची माहिती दिली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब राजूरकर सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे कोषाध्यक्ष मा.श्री. अशोक चौधरी सर व वाचनालयाचे सन्मानीय सदस्य मा.श्री. नामदेवराव जेनेकर विचारपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी सर्व मान्यवरांनी स्पर्धकांना आपल्या भाषणातून दररोज १ तास अवांतर वाचन करण्याचा निश्चय करावा असे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे संचालक मा.श्री. अनिलकुमार टोंगे तर सुत्रसंचालन वाचनालयाचे सचिव विजय बोबडे यांनी केले. या कार्यक्रमाला वाचनालयातील स्पर्धक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल शुभम कडू सर यांनी केले.*

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)