Top News

सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यीनीने पटकावले द्वितीय क्रमांक #chandrapur


श्री. शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनी
राजुरा:- श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय महाविद्यालय राजुरा येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 14 आणि 15 ऑक्टोबर 2022 रोजी दोन दिवसीय विद्यापीठ स्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीमध्ये एकूण 28 महाविद्यालयांनी सहभाग घेतला.

ह्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये सरदार पटेल महाविद्यालयातील बीएससी सेम फाईव्ह मधील एकूण चार विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

त्यापैकी दीप्ती फाडे आणि अदिती मुंगळे यांनी "नॅचरल इंडिकेटर " ह्या विषयाला धरून आपले प्रोजेक्ट सादर केले व त्यामध्ये दुसरे पारितोषिक पटकावले.

पारितोषिक मिळविल्याबद्दल दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर सर यांनी विजेत्या मुलींची पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. सोबतच इतर दोन विद्यार्थिनी ज्या सहभागी झाल्या होत्या. युगंधरा चामरे आणि समीक्षा जीवतोडे यांचेही प्राचार्यांनी कौतुक केले .
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. माधमशेट्टीवार सर उपस्थित होते. सोबतच या संपूर्ण विज्ञान प्रदर्शनी मध्ये काही विद्यार्थ्यांनी मोलाची कामगिरी आणि मदत केली. त्यापैकी प्रामुख्याने पराग धोपटे , पायल बनकर, नंदिनी उईके, आणि नमिता धामणकर आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांचेही प्राचार्यांनी कौतुक केले.
या विषयाची संपूर्ण संकल्पना व विद्यार्थ्यांना पूर्ण पणे तयार करण्याची जबाबदारी रसायनशास्त्र विभागाचे डॉ. दिलीप वाहाने यांनी पार पाडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने