Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

शेत परिसरात लागली आग #chandrapur #pombhurna #fire #firenews


सोनापूर येथे आग विझविण्याचा प्रयत्न करताना चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स चे विद्यार्थी 

पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर गावाजवळील चौथाले यांच्या शेत परिसरात आग लागल्याची घटना दि.२७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
आग लागल्याची माहिती गावकरी गावात सांगत आले. यावेळी चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा तर्फे सोनापुर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आग विझविण्यासाठी शेताकडे धाव घेतली. त्यांच्या सोबत गावकरी सुध्दा पोहचले. आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग वाढत असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.


 घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनांच्या स्वयंसेवकांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्याचे गावकऱ्यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत