उत्कर्ष छात्र शक्तीचा...! #Chandrapur #ABVP


मंगळवारी अभाविपचे जिल्हा विद्यार्थी संमेलन


चंद्रपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सर्वत्र 'उत्कर्ष छात्र शक्तीचा' नावाने जिल्हा विद्यार्थी संमेलन आयोजित होत आहेत. चंद्रपुरातील हे संमेलन मंगळवार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रियदर्शिनी सभागृहात होणार आहे.

संमेलनाला उद्घाटक म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची, तर प्रमुख अतिथी म्हणून हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहन आईंचवार, अभाविपचे विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम उपस्थित राहणार आहेत. वक्त्या म्हणून अभाविपच्या पूर्व प्रांत मंत्री तथा रा . तु. म. नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य शुभांगी उंबरकर यांचीही उपस्थिती राहील. संमेलनाला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अभाविपचे जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार, महानगर अध्यक्ष प्रा. पंकज काकडे, महानगर मंत्री रोहित खेडेकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत