Top News

सट्टामट्टा बंद पडल्याने सट्टा माफियांचा कल आता सुगंधित तंबाखू तस्करीकडे? #Chandrapur #Korpana #Gadchandur


तंबाखू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला कितपत यश?


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- पोलिस प्रशासनाने मागील काही महिन्यांपासून शिताफीने व मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, गुटखा अवैधरित्या तस्करी करून विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच सुगंधित तंबाखू, गुटखा, खर्रा, सिगारेट यांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून हा अवैध्य धंदा जवळ- जवळ बंद पाडण्यात यश मिळवले होते.

जुन्या सर्व तंबाखू माफियांवर, सट्टापट्टी चालकांनवर कारवाही करत त्यांचे धंदे बंद पाडण्यात गडचांदुर पोलिस प्रशासन यशस्वी झाले. तंबाकू विक्री करणाऱ्या किडिया व वणसडी येथिल इरफान, मकसुद, यांच्यावर झालेल्य पोलीस कारवाहीमुळे कोरपना तालुक्यातील तंबाखू विक्री करणाऱ्या लहान तसेच मोठया व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहे.

परंतु यांनतर सुद्धा काही लहान व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू ठेवत तंबाखू विक्री केली. तरीपण पोलीस प्रशासनाने त्यावर कारवाई करत सर्व तंबाखू विक्रेत्यांवर धाक निर्माण केला होता.
अशातच जवळपास तंबाखूचा बाजार बंद झाल्यागत असतानाच सर्व काही सुरळीत सुरू असताना जुन्या सट्टापट्टी व अट्टल गुन्हेगारांनी आपला कल तंबाखू विक्री करण्याकडे वळविला असल्याचे बोलले जात आहे.

प्रशासनातील आपले जुने कॉन्टॅक्ट वापरत, पोलीस प्रशासनाच्या काही जणांना हाती धरत त्यांनी तंबाखूचा धंदा जोमात सुरू केल्याचे बोलल्या जात आहेत. काही दिवसापूर्वी गडचांदूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत तालुक्यातील सर्वच ठिकाणावर धडक कारवाई करत अवैध धंद्यांवर आळा बसविण्याचे काम केले होते. परंतु आता जुन्या सट्टा माफियाने तंबाखू विक्रेत्यांची कमतरता व कमी वेळेत जास्त पैसा कमावण्याच्या नादात तंबाखू विक्रीकडे आपले लक्ष केंद्रित केल्याने पोलीस प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

गडचांदूर शहरातील अवैध्य सट्टा मटका चालक तसेच कोंबडा बाजार चालवणाऱ्या काही गुन्हेगारांनी पोलिस प्रशासनाने त्यांचे धंदे बंद पाडल्याने आता ते लोक सुगंधी तंबाखू विक्रीकडे वळले आहेत. यासाठी त्यांनी जुन्या लहान तंबाखू विक्रेत्यांना आपले मुख्य केंद्रबिंदू मानत त्यांना साम-दाम-दंड-भेद द्या नितीने आपल्याकडूनच तंबाखू विकत घेण्यासाठी परावृत्त करत आहेत.

यात नांदा येथिल एक जुना अवैद्ध दारू व्यवसायीक, गडचांदुर येथिल अवैध्य सट्टा मटका चालक, कोंबडा बाजार व चिकनचे दुकान चालवणारा, असे काही बेकायदेशीर धंदे चालवणारे व्यवसायिक मिळून आता सुगंधित तंबाखू विक्रीच्या मार्गी लागले आहेत. यासाठी त्यांनी शहरातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक हाताशी धरले आहेत व स्थानिक लहान पान मटेरियल वाल्यांना धारेवर धरत सुगंधी तंबाखू विक्रीचे रॅकेट चालवत आहेत. यामुळे भविष्यात सुगंधित तंबाखू विक्रीच्या कारणावरून भांडणे होणार नाही अशी शाश्वती देता येणार नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने