Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथे पट्टेदार वाघाचा धुमाकुळ #chandrapurसिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथे एका दिवसात दोन घटना घडल्या आहेत. काल गावपरीसरात गुराखी बाबुराव देवताळे यांचेवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी आले असता दवाखान्यात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. पट्टेदार वाघाने (tiger) स्थानिक रहिवाशी नरेंद्र नानाजी पिपरे यांच्या घराच्या गोठ्यात शिरून बैलावर हल्ला चढवत जागीच ठार केल्याची घटना काल रात्री 12:20 च्या दरम्यान घडली.

कच्चेपार हे गाव चहुबाजूने जंगलव्याप्त असल्याने कालच गट क्रमांक 147 मध्ये गुरेढोरे चारून घरी परतताना गुराखी बाबुराव लक्ष्मण देवताळे (56) यांना 5:00 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर पुढे उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना वाटेत राजोलीजवळ त्यांचा शरीर प्रतिसाद देत नसल्यामुळे नजीकच्या मुल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ही घटना ताजी असतानाच वाघाने गोठ्यात शिरूर बैलाला ठार केल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनकर्मचारी यांनी ताबड़तोब या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील लोकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत