Top News

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कार्यरत कंत्राटी कामगारांना नक्षल भत्ता लागू करा #chandrapur


मनसे प्रणित मराठी कामगार सेनेची मागणी


चंद्रपूर:- चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन सीएसटीपीएस हे देशातील सर्वात मोठे औष्णिक वीज निर्माण केंद्र असून, याची वीज निर्मिती क्षमता 2340 मेगावॅट इतकी आहे. महाराष्ट्र राज्याची 25% विजेची गरज एकटा सीएसटीपीएस भागवते. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात जवळपास अधिकारी व कर्मचारी मिळून 2100 नोकरदार आहेत. तसेच जवळपास 4000 कंत्राटी कामगार विविध कंत्राटामध्ये सीएसटीपीएस मध्ये काम करत आहेत.
    चंद्रपूर जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे सीएसटीपीएस मध्ये नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना 1500 रुपये नक्षल भक्ता देण्यात येतो. तसेच एकस्तर वेतनश्रेणी जास्त दिली जाते. परंतु सीएसटीपीएस अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना 1500 रुपये नक्षल भत्ता देण्यात येत नाही ही बाब अन्यायकारक आहे. एकाच कार्य क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी व कंत्राटी कामगारांमध्ये नक्षल भत्त्यासंबंधी हा भेदभाव केल्या जात आहे.
     
      
     ज्या निकषावर अधिकारी व कर्मचाऱ्यांना नक्षल भत्ता देण्यात येतो आहे. त्याच निकषावर कंत्राटी कामगारांना देखील 1500 रुपये नक्षल भत्ता द्या ही मागणी मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सचिन भोयर यांनी मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्यामार्फत महाजेनको कडे केलेली आहे. त्यासंबंधीचे निवेदन मुख्य अभियंता यांना दिलेले आहे.
     

    सदर कंत्राटी कामगारांची नक्षल भत्त्याची मागणीची पूर्तता महाजेनकोणी न केल्यास मनसे प्रणित मराठी कामगार सेनेतर्फे सर्व कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन मागणीची पूर्तता होईपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सचिन भोयर यांनी प्रशासनाला दिला आहे.
   

 यावेळी कामगार कल्याण अधिकारी आनंद वाघमारे, मराठी कामगार सेना जिल्हाध्यक्ष नितीन भोयर, युनिट अध्यक्ष गजानन जवादे, युनिट सचिव मंगेश चौधरी, युनिट उपाध्यक्ष संजय कोठारे, महाराष्ट्र सैनिक रंजन शहा आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने