प्रेमसंबंध बिघडल्याने युवकाची प्रेयसीला भररस्त्यात मारहाण #chandrapur #Nagpur #love #beating

Bhairav Diwase
0


नागपूर:- प्रेमात अचानक दुरावा केल्यामुळे संतापलेल्या तरुणाने एका १५ वर्षीय प्रेयसली भररस्त्यात अडवून मारहाण केली. तसेच अश्लील वर्तन करून विनयभंग केला आणि धमकी ही दिली.

ही घटना हिंगणा ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. आकाश कंगाले (२५) रा. हिंगणा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

हिंगणा ठाण्यांतर्गत राहणारी पीडित मुलगी ही दहावीची विद्यार्थिनी आहे. आकाशसोबत तिची अनेक दिवसांपासून मैत्री होती. काही दिवसांपूर्वी दोघांच्या संबंधाची पीडितेच्या आईला माहिती मिळाली. तिने मुलीला फटकारत आकाशपासून दूर राहण्यास सांगितले. त्यामुळे मुलीने आकाशपासून दुरावा करीत बोलचाल बंद केली. अचानक मुलीने दुरावा केल्यामुळे आकाश संतापला. तो सतत तिचा पाठलाग करून बोलण्यासाठी दबाव टाकत होता. दुपारी मुलगी शाळेत जात होती.

भररस्त्यात आकाशने तिला अडवले. बोलणे का बंद केले, अशी विचारणा केली. तिने त्याला दूर राहण्यास सांगितले. यामुळे चिडून आकाशने तिला शिविगाळ सुरू केली. रस्त्यावरच तिचे केस ओढून मारहाण करू लागला. तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करून विनयभंगही केला. मुलीने घरी जाऊन आईला घटनेची माहिती दिली. आकाशविरुद्ध हिंगणा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी विनयभंग, मारहाण आणि पोक्सो ॲक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून आकाशला अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)