Top News

"1984 च्या दंगल्यात.." हे कापून...! #Chandrapurloksabha #chandrapur


भावा-बहिणीच्या बद्दलच्या "त्या" वक्तव्याची अर्धवट क्लिप चुकीच्या पद्धतीने फिरवून संभ्रम पसरविल्या जात आहे?

1984 च्या अत्याचाराच्या काँग्रेसच्या जुलमाविरोधात बोलत राहण्याचा मुनगंटीवार यांचा निर्धार!

चंद्रपूर:- 1984 साली काँग्रेसने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली, तर कांग्रेसने त्याला चुकीच्या पद्धतीने पसरवून बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. त्या क्लीपमध्ये "1984 च्या दंग्यात...." एवढी ओळ कापून पद्धतशीर पणे आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र कांग्रेस च्या काही अपप्रवृत्ती करीत आहे. "1984 च्या दंग्यात पत्नीच्या नजरेसमोर पतीला जळत्या ट्रकमध्ये टाकले....." 1984 मध्ये झालेल्या दंगलीत कांग्रेसने केलेल्या अत्याचाराचा कथन केलेल्या प्रसंगाला तोडून गैरसमज पसरविल्या जात आहे. सत्य सांगितले तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप व्हायरल करुन काँग्रेसने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही असा इशारा ही दिला. 1984 च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोकपणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नसल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. 


लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यांतील मतदानाचा दिवस जसाजसा जवळ येत चालला आहे, तस तसे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडला असतांना पंतप्रधान मोदी यांच्या चंद्रपूर येथील जाहीर सभेने राजकीय वातावरण आणखीच तापले आहे. भाजप उमेदवार आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यावर आता मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. भावा-बहिणीच्या वक्तव्याची अर्धवट क्लिप का फिरवताय? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. काँग्रेसने केलेल्या जुलमाविरोधात बोलत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


चंद्रपूर येथे सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर सडकून टीका करणारे भाषण केले होते. या भाषणातील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या भाषणावरून मुनगंटीवार यांच्यावर टीका सुरू आहे. त्यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देत आपल्या भाषणाची क्लिप ट्वीट केली आहे.1984 च्या अत्याचाराच्या काँग्रेसच्या जुलमाविरोधात बोलत राहण्याचा मुनगंटीवार यांचा निर्धार ही त्यांनी यावेळी केला.

#NarendraModi #PMNarendraModi #SudhirMungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote #SudhirMungantiwarvspratibhadhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #maharashtrapolitics #rainupdate

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने