ACB Trap Case | नोकरीत कायम करण्यासाठी 12 लाखांची मागणी! #Chandrapur #acbchandrapur


शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव व महिला शिक्षक ACB जाळ्यात

चंद्रपूर:- पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर शिपाई म्हणून नोकरीस लागलेल्या मुलाला कायम करण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील गिरगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था गिरगांव या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव व महिला शिक्षक यांनी 12 लाखांची लाच मागितली.

त्यापैकी दीड लाख रुपये लाच स्वीकारताना चंद्रपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तिघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.8) संस्थेच्या सचिवांच्या सिंदेवाही येथील घरात करण्यात आली.

याबाबत नागभिड तालुक्यातील गिरगाव येथे राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेने चंद्रपुर एसीबी कडे तक्रार केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था गिरगांव द्वारा संचालित सावित्रीबाई फुले संस्थेचे सचिव मधुकर मोतीराम मोहूर्ले (वय 52), शिक्षिका मंगला मधुकर मोहूर्ले (वय-56), अध्यक्ष मोतीराम सखाराम मोहूर्ले (वय 79) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदार महिला ही नागभिड तालुक्यातील गिरगाव येथील रहिवाशी आहे. तक्रारदार यांच्या पतीचे निधन झाले असून ते सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गिरगाव येथे शिपाई सेवक म्हणून कार्यरत होते. सावित्रीबाई फुले विद्यालय तथा जुनिअर कॉलेज गिरगाव येथे तक्रारदार यांच्या पतीच्या जागेवर अनुकंपा तत्वावर मुलास शिपाई सेवक पदावर नोकरीवर लावली आहे. नोकरी लावल्याच्या बदल्यात संस्थेचे सचिव मधुकर मोहुर्ले यांनी तक्रारदार यांच्याकडून मुलाला नोकरी दरम्यान साधारणता: एक वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची मागणी करून स्वीकारले.

त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष, महिला शिक्षक व मधुकर मोहुर्ले यांनी 31 मार्च रोजी तक्रारदार यांना फोन करून तुमच्या मुलास प्रोबेशन कालावधीत नोकरीवरून काढून टाकायचे नसल्यास आणि प्रोबेशन पिरेड संपल्यानंतर शिपाई पदावर कायमस्वरूपी करण्याकरिता 12 लाख रुपये लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार त्यांनी 3 एप्रिल रोजी एसीबी कार्यालयात तक्रार दिली.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पडताळणी कार्यवाही केली. पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी शिक्षिका मंगला मधुकर मोहूर्ले यांनी आरोपी मधुकर मोहुर्ले यांना लाचेची रक्कम देण्याबाबत प्रोत्साहन दिले. तसेच 4 एप्रिल रोजी केलेल्या दुसऱ्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी संस्थेचे अध्यक्ष मोतीराम मोहुर्ले यांच्याबरोबर तडजोडी अंति सध्या बारा लाखां पैकी 1 लाख 50 हजार रुपये लाच देण्याचे ठरले.

त्यावरून सोमवारी (दि.8) संस्थेचे सचिव मधुकर मोहुर्ले यांच्या सिंदेवाही येथील घराजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मधुकर मोहुर्ले यांना ताब्यात घेतले. इतर आरोपींनी आपल्या लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता लाचेची मागणी करून स्वीकारली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिघांना ताब्यात घेतले.

ही कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरणुले, पोलीस अंमलदार वैभव गाडगे, अमोल सिडाम, पुष्पा काचोळे व चालक सतीश सिडाम यांच्या पथकाने केली.

#NarendraModi #PMNarendraModi #SudhirMungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote #SudhirMungantiwarvspratibhadhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #maharashtrapolitics #rainupdate

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने