"त्या" अर्धवट व्हिडिओ बाबत सायबर क्राईमकडे करणार काँगेसची तक्रार! #Socialmedia #viralvideo


वरोरा:- काँग्रेसने दंगल घडवून १९८४ ला आणीबाणीच्या काळात शीख बांधवांना प्रचंड त्रास दिला, अन्याय अत्याचार केला, याचा अर्धवट व्हिडिओ कट करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या दंगलीत काँग्रेसने किती अन्याय अत्याचार केले हे सर्वश्रुत असताना मीडियामध्ये कुठलाही विपर्यास केलेला नाही. पण काँग्रेस मुद्दामपणे जनतेची दिशाभूल करण्यासाठी अर्धवट व्हिडिओ व्हायरल करने सुरू केले आहे. त्यामुळे याची आपण सायबर क्राईमकडे तक्रार करणार आहोत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करू असे महायुतीचे लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मंगळवार दि. ९ रोजी वरोरा येथील प्रचार सभेत केले. चंद्रपूर लोकसभा महायुतीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांचे मंगळवारी सकाळी वरोरा येथे आगमन होताच भगव्या सांस्कृतिक वाद्य पथकाच्या ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

विकास हाच माझा मुद्दा!

विकास हाच माझा प्रमुख मुद्दा आहे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना माझा आदर्श आमदार म्हणून गौरव करण्यात आलेला आहे. मागील २९ वर्षापासून मी आमदार आहे. मला विधानसभेत काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर मी संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करेल याचा तुम्हाला विश्वास देतो असे ते म्हणाले.

काँग्रेसला मत म्हणजे विनाशच विनाश!

कडूलिंबामध्ये कितीही साखर टाकली तरी ते कडूच राहते गोड होत नाही. तशीच अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे, आज पर्यंत काँग्रेसने जनतेची निराशा केली आहे. त्यामुळे वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. या विभागाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कमळला मतदान करा, विकास म्हणजे कमळ आणि काँग्रेस म्हणजे विनाशच विनाश, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, घाणेरडे राजकारण केले नाही. मला एक दिवस ताप आला तरी काँग्रेसने त्याचे घाणेरडे राजकारण केले, पण मी विकासाचा राजकारण करतो विकासावर बोलतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या