Crime News : लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या #chandrapur #Gondia

Bhairav Diwase
गोंदिया:- विवाहस्थळी आलेल्या एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 20) सकाळी देवरी तालुक्याच्या गोठणपारलगतच्या जंगलात उघडकीस आली.


मिळालेल्या माहितीनुसार, देवरी तालुक्यातील गोठणपार येथे 19 एप्रिलला लग्नात अल्पवयीन मुलगी ही आपल्या पालकांसह उपस्थित होती. याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी तिचे अपहरण केले. गावाशेजारी असणाऱ्या जंगलात अत्याचार केला आणि चेहरा दगडाने ठेचून तिची हत्या केली.


दरम्यान, लग्न कार्यात व्यस्त असलेल्या पालकांना जेव्हा मुलगी लग्नस्थळी आढळली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, रात्री कुठेही तिचा पत्ता लागला नाही. गावकरी आणि इतर नातेवाइकांनी शेजारच्या गावातही मुलीचा शोध घेतला.


मात्र, त्याच फायदा झाला नाही. तथापि, शनिवारी (ता. 20) धवलखेडी गावातील गावकरी जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेले असता तिथे त्यांना मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी चिचगड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. श्वानपथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.