Top News

महाशिवरात्रीच्या सुटीत आखला प्लॅन #chandrapur #bhadrawati #wardhariver

वर्धा नदीत पोहोण्यासाठी गेलेले तीन तरुण बेपत्ता
चंद्रपूर:- चंद्रपूर:- महाशिवरात्रीच्या सुटीच्या निमित्याने वर्धा नदीत पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी तीन मुले वाहून गेले. ही धक्कादायक घटना आज शुक्रवारी (ता.८) सायंकाळच्या सुमारास पटाळा येथे घडली.

Also Read:- नाल्यात कार कोसळून CISF च्या जवानाचा मृत्यू

संकेत नगराळे (वय १९), अनिरुद्ध चापले (वय १९) व हर्षद चापले (वय १८) असे नदीत वाहून गेलेल्या मुलांची नावे असून तिघेही वणी शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी आहेत.


Also Read:- दुसऱ्या प्रियकराने प्रेयसीच्या पहिल्या प्रियकराचा केला खून


वणी शहरातील दहा ते १२ मुले महाशिवरात्रीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील पुरातन शिव मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. परत येत असताना पटाळा परिसरातील वर्धा नदीवर पोहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पोहत असताना हर्षद पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे मित्रांना दिसले. त्यामुळे अनिरुद्ध व संकेतने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघेही वाहून गेले.



हा प्रकार घडताच अन्य मुले घाबरली व त्यांनी याप्रकरणी पोलिसांसह घरच्यांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले व वाहून गेलेल्या मुलांचा शोध सुरू केला आहे. वृत्त लिहिपर्यंत मुलांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने