गडचिरोली:- नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली पिकअपला बांधून नेत असताना सदर पिकअप वाहनाने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एक महिला ठार तर एक युवक गंभरी जखमी झाल्याची घटना २ एप्रिल राेजी गुरूवारला सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास शहरातील मुल मार्गावर कारगिल चाैकात घडली.
आपल्या लहान मुलाचे लग्न आटाेपून सावलीकडे परत जाताना नवरदेवाच्या आईचा अपघाती मृत्यु झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Also Read:- छत्तीसगड चकमकीत गडचिरोलीतील चार नक्षल कमांडर ठार
रेखा नामदेव राऊत (४४) रा. सावली जि. चंद्रपूर असे मृतक महिलेचे नाव आहे. तर दुचाकीस्वार बंडू भलवे (२७) रा. सावली. हा जखमी झाला. अपघात घडल्यानंतर गडचिराेली पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेत दाेन्ही जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान रक्तबंबाळ झालेल्या रेखा राऊत या महिलेचा मृत्यु झाला. तर जखमी बंडू भलवे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सावली येथील नामदेव राऊत यांच्या दाेन मुलाचे लग्न हाेते. अमित राऊत नामक माेठ्या मुलाचे लग्न १ मे बुधवारला राेजी सावली येथे पार पडले. तर २ मे राेजी लहान मुलगा अविनाश राऊत याचे लग्न रांगीनजीकच्या निमगाव येथे हाेते. सदर लग्नकार्य आटाेपून नवरदेवाची आई रेखा राऊत ही दुचाकीवर गडचिराेलीमार्गे सावलीकडे जात हाेती. दरम्यान कारगिल चाैकात पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.