दोन ट्रकची समोरासमोर धडक, दाेन ठार, अपघातात ३०० बकऱ्यांचाही मृत्यू #chandrapur #yawatmal #wani #accident

Bhairav Diwase
0
वणी (यवतमाळ):- यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास परस्पर विरूद्ध दिशेने धावणाऱ्या दोन ट्रकची टक्कर झाली. या अपघातात मध्य प्रदेशातील सोहन सिंह रामचरण यादव व मुहूर्त धर्मेंद्र हिरालाल यादव हे दोघे जागीच ठार झाले. दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाले आहे.



या अपघातात ट्रकमधील ३०० बकऱ्यासुध्दा ठार झाल्यात. चंद्रपूर येथून सिमेंट भरून यवतमाळकडे निघालेल्या एमएच ४० एम२८५८ क्रमांकाचा ट्रक आणि मध्यप्रदेशातून तेलंगणात बकऱ्या भरून निघालेला एमएम ४० सीटी ५५५८ क्रमांकाचा ट्रक, या दोन ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर झाली. अपघातात ट्रकमधील दोनजण जागीच ठार झाले तर ट्रकमधी सुमारे ३०० बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले.


जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जखमींना तातडीने उपचारार्थ दवाखान्यात रवाना करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पांढरकवडा पोलिसांनी दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी मरण पावलेल्या बकऱ्यांचा मोठा खच पडून आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)