Top News

पूर्ववैमनस्यातून डोक्यात कवेलू घालून हत्या #chandrapur


गडचिरोली:- यात्रेतील भांडणातून तसेच पूर्ववैमनस्यातून आरोपीने तरुणाच्या डोक्यात कवेलू घालून खून केल्याच्या प्रकरणाचा 26 दिवसानंतर उलगडा झाला. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्रदीप ऊर्फ पंड्या विजय घोडेस्वार (वय 30, रा. कुरुड) असे मृतकाचे नाव आहे. विकास जनार्दन बोरकर (वय 50, रा. कुरुड) असे आरोपीचे नाव आहे.


देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे 8 फेब्रुवारीला रात्री यात्रोत्सवानिमित्त नाटक होते. नाटक पाहण्यासाठी गेलेल्या प्रदीप घोडेसवार याचा मृतदेह त्याच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. वैद्यकीय अहवालानंतर 28 फेब्रुवारीला पोलिस उपनिरीक्षक संजय गोंगले यांच्या फिर्यादीवर अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक चौकशी केली असता प्रदीपचे गावातीलच विकासची नेहमीच भांडण होत असल्याचे उघडकीस आले.



या दिशेने तपास करत विकासची चौकशी केली असता त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर यांनी आरोपी विकासला अटक केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने