Top News

महाशिवरात्रीच्या यात्रेत तैनात सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू #gadchiroli#chandrapur #death


चामोर्शी:- तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना काल दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. भैयाजी पत्रू नैताम(५२) असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, ते अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथील उपपोलिस ठाण्यात कार्यरत होते.


चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरली आहे. त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भैयाजी नैताम हेदेखील बंदोबस्तावर होते. मात्र, दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.


भैयाजी नैताम हे मुलचेरा तालुक्यातील कोपरअली येथील मूळ रहिवासी आहेत. शवविच्छेदन केल्यानंतर नैताम यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. आष्टी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने