भद्रावती:- कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या डिवाईडला जोराची धडक देऊन नाल्यात कोसळलेल्या एका कारने पेट घेतला. या अपघातात चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ८ मार्च) रोजी सकाळी नागपूर- चंद्रपूर मार्गावरील भद्रावतीपासून ५ किमी अंतरावरील कोंढा नाल्यात उघडकीस आली आहे.
Also Read:- महाशिवरात्रीच्या सुटीत आखला प्लॅन
मृतकाचे नाव दीपक चरण बघेल असे आहे. तो सिआयएसएफ मध्ये जवान होता. तो जामनगर गुजरात येथे कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी तो रजेवर आला होता. भद्रावती तालुक्यातील मल्हारी बाबा सोसायटी, सुमठाणा येथील रहिवासी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक कार (क्र. 23 बिएच 68550 ) चालक हा चंद्रपूर- नागपूर मार्गावरील भद्रावतीच्या दिशेने येत होता. भद्रावती पासून ५ किमी अंतरावरील कोंढ्यानाल्यावरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारची पुलाच्या डिवाईडला जोरदार धडकली. त्यानंतर ही कार नाल्यात कोसळली.
दरम्यान कारमधून चालकाने बाहेर पडल्याचा प्रयत्न केला परंतु, तो बाहेर निघून शकला नाही. यावेळी कारमध्ये फक्त चालकच होता. कारने काही वेळात पेट घेतला. त्यामुळे चालकाचा होरपळून मृत्यू झाला. सकाळी काही नागरिकांना नाल्यात कार पेटलेल्या अवस्थेत आढळून आली.