Top News

"तिच्या" जगण्याला पंख फुटले! The wings have been shown solely to give a sense of proportion.


यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते', या पुरुषप्रधान संस्कृतिप्रिय वाक्‍याला मागे टाकत त्याच स्त्रीने पुरुषांनाही आता "ओव्हरटेक' केले आहे. आपणही पुढे जायचे... या जिद्दीने, चिकाटीने आणि आत्मनिर्भर होण्याच्या ऊर्मीने ती धडपड करते आहे. ती व्यवसायात पाय रोवून उभी राहिली आहे. स्वतःतील कला-कौशल्यांना तिने पंख दिले आहेत. नवयुगात ती व्यावसायिक होते आहे, इतर महिलांच्या हातालाही काम देते आहे. महिला राजकारण, समाजकार्य, आरोग्य, फिटनेस, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांत ती काम करते आहे. 8 मार्च हा दिवस स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

स्त्री ही क्षण काळाची पत्नी व अनंत काळाची माता आहे. तिला आई, बहीण, मुलगी, पत्नी, मैत्रीण, मावशी, आजी इत्यादी अनेक नाती हळुवारी जोपासावी लागतात. स्त्री ही सृष्टीचे जीवन चक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते आहे. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा स्त्री असते. स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही. सासर व माहेरच्या दोन्ही घरांना नकळतपणे जोडते. स्त्री आपले मुल संस्कारशील ,अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते. मुल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंत जबाबदारी स्त्री विनातक्रार पार पडते. त्यामुळे साने गुरुजी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक महान पुरुष घडले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे ढाल बनते. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या सारखे थोर पुरुष महान कार्य करू शकले.


स्त्री फक्त कुटुंबासाठी झटत नाही तर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ यासारख्या अनेक स्त्रीया मायभूमीच्या रक्षणासाठी रणरागिणी झाल्या. सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय योगदान दिले.


आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. गावच्या सरपंचपदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ति आघाडीवर आहे. भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळवीर कल्पना चावला, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, समाजसेविका रमाबाई रानडे, पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, समाजसेविका मदर तेरेसा, गायिका लता मंगेशकर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पहिल्या महिला पायलट सरला ठाकराल तसेच महिला खेळाडू पी. टी. उषा, सायना नेहवाल, स्मृती मानधना इ. अनेक स्त्रीयांनी आपल्या क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध केले आहे.
आज स्त्रीचा गौरव केला जातो पण तरीदेखील महिलांच्या समोर अनेक समस्या आहेत. स्त्री भ्रूणहत्या, लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती इ. समस्या पदोपदी महिलांना भेडसावतात. त्या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रीयांचे कार्यक्षेत्र विस्तारेल.


महिलानो, आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वतःपासून बदल करा. कारण पुढची पिढी कशी घडवायची हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही अखंड प्रेमाचे व प्रेरणेचा स्रोत आहात. स्वतः खंभीर रहा. जीवनात येणाऱ्या संकटाचा जिद्दीने सामना करा. कधीही वाईट गोष्टींचा संग धरू नका; कारण जगण्यासाठी नव्हे तर या पृथ्वीतलावर जन्म घेण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतो. स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर करून एक चांगली व्यक्ती, माणूस म्हणून बनून दाखवा. आपले वाचन, लेखन, इ. छंद जोपासून नेहमी आनंदी रहा. कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटावा. आत्मनिर्भर बना. ईश्वराने दिलेला सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातल बळ कमी होवू देवू नका. थोर स्त्रीयांची विचार, चरित्र सदैव स्मरणात ठेवा.

नारी तू घे अशी उंच भरारी
फिरून पाहू नकोस माघारी

भैरव धनराज दिवसे
8007101459, 9325856751

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने