मुंबई:- राज्य उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात १२२३ पदे नव्याने भरली जाणार आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालये सुरू केली जाणार आहेत. याशिवाय उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून एआय आधारित कंट्रोल रूम देखील तयारी केली जाणार आहे.