मुंबई:- राज्यातील मद्यप्रेमींसाठी चिंताजनक बातमी आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर ( IMFL) दिड टक्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार कोटींचा महसूल वाढणार आहे. कोणते मद्य आता किती रुपयांना मिळणार ते जाणून घेऊयात.
१८० मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत
देशी मद्य- 80 रुपये
महाराष्ट्र मेड लिकर – १४८ रुपये
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – २०५ रुपये
विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड- ३६० रुपये
यासोबतच राज्य सरकारने आता सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता दिली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता यातून आणखी महसूल वाढणार आहे.