अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक #fakevideo #arrested #amitshaha


द्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी सोमवारी एकाला अटक करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.


आसामचे मुख्यमंत्री यांनी एक्सवर लिहिले आहे की, आसाम पोलिसांनी रितोम सिंह नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने अमित शाह यांचा आरक्षणासंदर्भात तयार केलेला एडिटेल (फेक) व्हिडिओ शेअर केला होता.

असा होता एडिटेड व्हिडिओ

खरे तर, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, अमित शाह एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्ट आणण्यासंदर्भात बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, पीटीआयच्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा फेक सिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते अमित शाह

अमित शाह गेल्या काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी तेलंगणामध्ये गेले होते. येथे काँग्रेसवर निशाणा साधताना शाह म्हणाले होते, भाजपचे सरकार आल्यास, बेकायदेशीर मुस्लीम आरक्षण नष्ट केले जाईल. तेलंगानातील एससी-एसटी आणि ओबीसींचा हा अधिकार आहे, जो त्यांना मिळणारच.

फेक व्हिडिओ संदर्भात भाजप आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने तक्रार केली होती. यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले होते. 


हा व्हिडिओ एक वर्षापूर्वी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये अमित शाह मुस्लिम आरक्षणावर भाष्य करताना दिसत आहेत. अमित शाह यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या या संपूर्ण भाषणाचा व्हिडीओही आम्हाला पाहायला मिळाला.

हा व्हिडिओ एक वर्षापूर्वी अपलोड करण्यात आला होता. १४ मिनिटे ३० सेकंदानंतर अमित शाह मुस्लिम आरक्षणाबाबत बोलताना दिसतात. ते म्हणतात, 'भाजपला सत्तेवर आल्यास आम्ही हे असंवैधानिक मुस्लिम आरक्षण संपवू. तेलंगणातील एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांना ज्या संधी मिळाव्यात, त्याच संधी मुस्लिम आरक्षण संपवून त्यांना दिल्या जातील.' सत्तेत आल्यास एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात आणू असे अमित शहा यांनी संपूर्ण भाषणात कुठेही म्हटलेले नाही.

निष्कर्ष: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा व्हायरल व्हिडिओ ज्यामध्ये ते भाजप सत्तेत आल्यास ते एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात आणतील असं म्हटल्याचा दावा केला जात आहे, हा एडिटेड आहे. व्हायरल दावा खोटा आहे. या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या