तालुका अध्यक्ष विजय जुलमे यांच्या नेतृत्वात येणाऱ्या सर्व निवडणूका राजुरा तालुक्यात ताकतीने लढवणार
राजुरा:- वंचित बहुजन आघाडी तालुका राजुराची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी तालुका राजुरामध्ये येणाऱ्या सर्व निवडणूडका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, या ताकतीने लढवणार असुन त्या अनुषंगाने वंचित आघाडीचे सर्व आजी माजी कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रामध्ये कामाला लागलेले आहे. राजुरा तालुक्यामध्ये अध्यक्ष विजय जुलमे झाल्यापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये एक नवीन नवचैतन्य निर्माण झाले आहे.
बैठकीत अध्यक्षीय भाषणात विजय जुलमे यांनी येणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये राजुरा तालुक्यातून वंचितचा झेंडा फडकवल्या राहणार नाही असे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना संबोधित केले. या बैठकी मध्ये उपस्थित जिल्हाचे सदस्य सच्चिदानंद रामटेके, किशोर रायपुरे, तालुका महासचिव नागोराव पडवेकर, तालुका उपाध्यक्ष, मुरलीधर ताकसांडे, तालुका उपाध्यक्ष रुषी रायपुरे, शहर महिला अध्यक्षा किरणताई खैरे, प्रभुदास वनकर, मारोती घागरगुंडे, उत्तम रामटेके, विठ्ठल धोटे, शकुंतला ठमके, सुमन नगराडे, माला तामगाडगे, शारदा मोडक, अर्चना निमसटकार आणि इतर सर्व बरेच कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.


