गोंडपिपरी:- मध्यचांदा वनविभागाअंतर्गत गोंडपिपरीलगतच्या चेकपिपरी व गणेशपिपरी परिसरात वाघाच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले असून गेल्या आठ दिवसात वाघाने तालुक्यात २० ते २५ जनावरांचा बळी घेतल्यानंतर आठवडाभरातच दोन शेतकऱ्यांना ठार केले.
दि.(१८) शनिवारी चेकपिपरी येथील भाऊजी पाल व दि.(२६)रविवारी गनेशपिपरी येथील अल्का पेंदोर महिलेला वाघाने शेतात ठार केले.त्यानंतर दि.(२७) संतप्त जनतेने वन विभागाच्या विरोधात आंदोलन करून सामान्य लोकांची ताकद प्रशासनाला दाखवून दिली.सुमारे नऊ तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अडवून धरली.
टि 115 नरभक्षक वाघ पकडण्याची जबाबदारी गोंडपिपरी तालुक्याच्या भूमिपुत्राच्या हाती वनविभागाने दिली आहे.तालुक्यातील बोरगाव येथील अविनाश झावरुजी फुलझेले हे सेवानिवृत्त सैनिक सध्यास्थितीत बलारशहा वनपरिक्षेत्रअंतर्गत अविनाश फुलझेले अतीशीघ्रदलात कार्यरत आहे.ते मूळचे गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील भूमिपुत्र असून त्यांच्यावर वाघाला बेशुद्ध करण्याची जबाबदारी दिली आहे.यापूर्वी त्यांनी ८ वाघ १ बिबट जेरबंद करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.एकाच संधीत नेमबाजीत त्यांनी ही मोहीम या पूर्वी पार पाडली आहे.


