विरुर मार्गातील सिरसी गावाजवळील पहाटेची घटना.
राजुरा:- राजुरा तालुक्यातील राजुरा ते विरुर मार्गातील सिरसी गावालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत मोठी अस्वल जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 6 जानेवारी रोज बुधवारला पहाटेच्या सुमारास घडली. अन्नूर तपासणी नाक्यावर ड्युटीवर जात असतांना चंद्रशेखर मेडपल्लीवार या वनकर्मचारीला अस्वल रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत पडून असल्याचे दिसताच लगेच राजुराचे वन क्षेत्रपाल विदेशकुमार गलगट यांना त्यांनी माहिती दिली.
माहिती मिळताच क्षेत्र सहायक श्रीनिवास कटकू, वनरक्षक वर्षा वाघ, प्रियंका जावळे आणि वनमजुर घटनास्थळी पोहचून मोका पंचनामा करीत आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत या अस्वलीचा मृत्यू झाला असे घटनास्थळावरून समजते. अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. ही अस्वल मादी असून पूर्ण वाढ झालेली होती.