Top News

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली, "या" प्रमुख नेत्यांकडे जिल्हानिहाय जबाबदारी...

Bhairav Diwase. Jan 06, 2021
मुंबई:- राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे. यासाठी पक्षाने काही पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.


महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक आणि जबाबदारी......

  1. सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर आणि वर्धा
  2. पंकजा मुंडे- बीड
  3. चंद्रशेखर बावनकुळे- नागपूर आणि भंडारा
  4. गिरीष महाजन- जळगाव आणि अहमदनगर
  5. आशिष शेलार - ठाणे
  6. रविंद्र चव्हाण - सिंधुदुर्ग
  7. रावसाहेब दानवे पाटील - नांदेड
  8. संजय कुटे- अकोला आणि अमरावती
  9. सुरेश हाळवणकर - सांगली आणि पुणे
  10. सुभाष देशमुख - कोल्हापूर
  11. प्रसाद लाड - रत्नागिरी उत्तर-दक्षिण
  12. प्रविण दरेकर- रायगड उत्तर-दक्षिण
  13. विनोद तावडे - पालघर
  14. गिरीष बापट - सातारा
  15. संजयबाळा भेगडे- सोलापूर
  16. संभाजी पाटील निलंगेकर- लातूर आणि उस्मानाबाद
  17. प्रीतम मुंडे - परभणी
  18. बबनराव लोणीकर - हिंगोली
  19. डॉ.भागवत कराड - जालना
  20. जयकुमार रावल- धुळे
  21. प्रा.देवयानी फरांदे-नंदुरबार
  22. प्रा.राम शिंदे - नाशिक
  23. चैनसुख संचेती - यवतमाळ
  24. रणजीत पाटील - वाशिम
  25. डॉ.अनिल बोंडे - बुलढाणा
  26. अनिल सोले- गोंदिया
  27. हरिभाऊ बागडे -औरंगाबाद
  28. डॉ.रामदास आंबटकर - गडचिरोली


असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे.तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:- 

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने