Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

Bhairav Diwase. Jan 06, 2021
पोंभुर्णा:- स्थानीय चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. टी एफ गुल्हाने होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्राचार्य यांनी संदेश देतानी म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाले. महात्मा ज्योतिबांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी आहेत. ज्योतिबा मुळे क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या पुढाकारातून मातृ शक्तीचा विकास झाला हे मात्र तितकेच खरे.

      यावेळी कार्यक्रमाला डॉ. पूर्णिमा मेश्राम डॉ. संघपाल नारनवरे, प्रा. ओमप्रकाश सोनवणे, प्रा. बुधे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने