Top News

पत्रकार दिनानिमित्त कोरोनायोद्धयांचा तथा जेष्ठ पत्रकारांचा सत्कार.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा राजुराचे उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस संपूर्ण देशात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ-मुंबई शाखा राजुराचा वतीने दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा दि. 6 जानेवारी 2020 रोज बुधवारला पत्रकार दिनानिमित्त राजुरा तालुक्यातील सामाजिक कार्यात आपले महत्वाचे योगदान देणाऱ्या कोरोनायोद्धांचा तसेच जेष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

         त्यामध्ये सत्कारमूर्ती म्हणून आपल्या लेखणीने समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे जेष्ठ पत्रकार मा. डॉ. उमाकांत धोटे आणि मा. चरणदास नगराळे, नगर परिषद राजुरा येथील महिला सफाई कामगार सौ. सविता सुरेश धोटे तसेच कु. प्रियंका आसमपेल्ली, ग्रामीण रुग्णालय राजुरा येथील महिला सफाई कामगार सौ. गिरीजा कन्नाके आणि सौ. मंजुषा टेकाम, वृत्तपत्रे वितरण ( वाटप ) करणारे श्री. बंडुभाऊ गोंगले आणि गौरव मोरे या कोरोनायोद्धांचे आणि जेष्ठ पत्रकारांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुरा तर्फे सत्कार करण्यात आला.

               याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुराचे अध्यक्ष मा. प्रा. अनंत डोंगे, सचिव राहुल थोरात, कार्याध्यक्ष रत्नाकर पायपरे, उपाध्यक्ष उज्वल भटारकर, प्रविण मेकर्तीवार, सहसचिव ओंकार आस्वले, ता. संघटक संतोष देरकर, कोषाध्यक्ष वैभव धोटे, प्रसिद्धी प्रमुख संतोष मेश्राम, जिल्हा प्रतिनिधी आदित्य भाके, प्रेस फोटोग्राफर रुपेश वाटेकर, कैलास कार्लेकर, संजय रामटेके, अंकुश भोंगळे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने