खास. अशोक नेते यांनी सर्व कार्डधारकांना अन्नधान्य वाटप करून कार्ड नसलेल्या कुटुंब प्रमुखांना रेशन वाटपाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना.
Bhairav Diwase. April 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली :- आज दि 13 एप्रिल रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मा.खासदार अशोकजी नेते साहेब यांनी सावली तालुक्यात दौरा करून अधिकारी तसेच पधाधिकारी यांचेकडून कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी तहसीलदार पुष्पलता कुमरे, ठाणेदार म्हस्के , संवर्ग विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, न पं मुख्याधिकारी यांना कोरोनाच्या सद्यस्थिती बाबत विचारपूस केली व लॉकडाऊन व्यवस्थित सुरु ठेवून कोरोना नियंत्रणासाठी परिश्रम घेण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यांनी केल्या. यावेळी तहसीलदार कुमरे यांनी सांगितले की गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील 21 जणांना होम कांरटाइन मध्ये ठेवण्यात आले असून आतापर्यत 2963 नागरिकांना कांरटाइन मध्ये ठेवण्यात आले असून 2628 जणांचा कालावधी पूर्ण झाला असून 335 जण कांरटाईन मध्ये आहेत. यावेळी खासदार अशोक नेते यांनी रेशन वाटपाबाबत माहिती विचारली असता तालुक्यात 85 स्वस्त धान्य दुकाने असून 925 कार्ड धारक कुटुंब आहेत त्यांना मोफत धान्य वाटप सुरु असून कार्ड नसलेले 393 कुटुंब प्रमुख असल्याची माहिती तहसीलदार कुमरे यांनी दिली.
याप्रसंगी खास.अशोक नेते यांनी सर्व कार्डधारकांना अन्नधान्य वाटप करून कार्ड नसलेल्या कुटुंब प्रमुखांना रेशन वाटपाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. सावली तालुकाध्यक्ष,अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार,नगरसेवक चंद्रकांत संतोषवार,संचालक कृ.उ बा समिती सुनील गेडाम,गड जिल्हा महामंत्री, भरत खटी, गड शहर महामंत्री, अविनाश विश्रोजवार व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.