पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथील शेतकऱ्यांनी बनविला लोकवर्गणीतून शेतरस्ता.

Bhairav Diwase
लोकवर्गणी जमा करून जमा झालेल्या पैशातून 600 मीटरचा रस्ता मुरूम टाकून पक्का रस्ता.
Bhairav Diwase.   May 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:-  शेतकऱ्यांना आपल्या शेतात रोजच जावे लागते, बी बियाणे, खते नेण्यासाठी बैलबंडी चा वापर करावा लागतो तसेच शेतातील वखरणी, डवरणी नांगरणी यासारख्या कामासाठी जातांना चांगला रस्ता नसल्याने  पावसाळ्यात  चिखलातून जावे  लागते, रस्त्यावर  चिखल पडत असल्याने आपल्या शेतात जाण्या-येण्यासाठी खूपच त्रास होतो, हा त्रास होऊ नये म्हणून आष्टा येथील चेक पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथील सरपंच हरिष ढवस यांच्या पुढाकाराने  शेतशिवरात जाणाऱ्या सर्व  शेतकऱ्यांनी एकत्र येऊन  लोकवर्गणी जमा करून जमा झालेल्या पैशातून 600 मीटरचा रस्ता मुरूम टाकून  पक्का रस्ता बनविला.
    या रस्त्यामुळे पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथील शेतकरी यांना आता पावसाळ्यात सुखरूप आपल्या शेतात जाता येणार आहे,