Click Here...👇👇👇

घरकाम आणि शेतीकाम करून कु. तृप्ती मुसद्दिवार सावली तालुक्यातून प्रथम.

Bhairav Diwase
विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली येथे शिक्षण घेत होती.
Bhairav Diwase.    July 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली येथील तृप्ती ज्ञानेश्वर मुसद्दिवार रा. उसेगाव या मुलीने  कला महाविद्यालयातून सावली तालुक्यातील प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे तिला सर्व विषयात प्राविण्य सह ८६.३०% गुण मिळाले आहे.
तृप्ती ही सावली पासून सात किलोमीटर अंतर असलेल्या या गावातून सायकल शाळेत यायची विशेष असे की शाळा सुटल्यानंतर घरकाम आणि शेती काम करून नियमित अभ्यास करणे असे तिने तिच्या यशाचे गमक सांगितले आहे
आपल्या यशाचे श्रेय आई-वडील विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ए. के. राऊत, प्रा. एन. आर. ओल्लालवार, प्रा. डी. पी. दूधे, प्रा. आर. व्ही. केदार, प्रा. पि.बी. गेडाम, प्रा. सी. डब्लू. प्यारमवार या सर्व शिक्षकांना दिले आहे.