आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपातर्फे मुल तालुक्यात गावोगावी आंदोलन.

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्हा भाजपाच्या आव्हानाला प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद.
Bhairav Diwase.    July 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- संपूर्ण देश एकीकडे कोरोणा सारख्या वैश्विक महामारीला तोंड देत असतांना महाराष्ट्रात सत्तास्थानी असलेले महाविकासआघाडी सरकार राज्याचा गाडा हाकण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. आणि राज्यातील सामान्य जनतेसहीत शेतकरी, शेतमजुर आणि गोरगरीबांच्या समस्‍यांकडे, अडचणींकडे या निद्रीस्त सरकारने दुर्लक्ष केले आहे. यासाठी या तिघाडी सरकारचे लक्ष वेधून घेत अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत महाविकासआघाडी सरकारच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी मुल तालुका (ग्रामीण) यांच्यावतीने तालुक्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक बूथवर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले. 
यामध्ये, कोरोणासारख्या जागतिक महामारीच्या संकटात संपूर्ण देशभर टाळेबंदी घोषित आहे. त्यामुळे मागिल काही महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने ग्राहकांकडे अवाढव्य वीज बिलाची मागणी केली आहे. त्यामुळे हे वीज बिल संपूर्णतः माफ करण्यात यावे. आणि एप्रिल २०२० पासून केलेली विजेची दरवाढ मागे घेण्‍यात यावी. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत चौदा हजारापेक्षा जास्‍त लाभार्थी आहेत. या योजनेचा निधी लाभार्थ्‍यांना न मिळाल्‍यामुळे सदर नागरिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे तो निधी सुध्‍दा तातडीने देण्‍यात यावा. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईस्थित राजगृह निवासस्थानाची काही समाजकंटकांनी तोडफोड केली, या घटनेचा उच्चस्तरीय चौकशी करून संबधितांना कठोर शिक्षा व्हावी. यासोबतचं विद्यमान शासनाने कर्जमाफी जाहीर केली, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे, शिवाय अनेक शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन सुध्‍दा झालेले नाही. त्‍यामुळे हंगामाच्‍या तोंडावर शेतकरी आर्थिकदृष्‍टया हवालदिल झालेला आहे. या आर्थीक संकटातुन शेतकऱ्याला बाहेर काढण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना युरीया व संबंधित खते तातडीने उपलब्‍ध करून द्यावे. तसेच टाळेबंदीत अनेकांचा रोजगार गेला, हातावर पोट घेवून जगणार्‍यांसमोर उदरनिर्वाहाची समस्‍या निर्माण झाली. त्यामुळे बारा बलुतेदार व गोरगरीबांना राज्‍य सरकारतर्फे पॅकेज देण्‍यात यावे. अशा विविध मागण्यांना केंद्रस्थानी ठेवून गावोगावी आघाडी सरकारचे निषेध नोंदविण्यात आले. 

यावेळी, संपूर्ण तालुक्यातून जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, पं. स. सभापती चंदू मारगोणवार, उपसभापती घनश्यामजी जुमनाके,पं. स. सदस्या पुजा डोहणे, वर्षा लोनबले, अमोल चुदरी, संजय येनुरकर, आनंद पा. ठिकरे, अमोल येलंकिवार, ईश्वर कोरडे, सुभाष बुक्कावार, सुभाष सुंभ, दिलीप पाल, मंगेश मगनुरवार, मुकेश गेडाम, तुळशीराम कुंभारे, अभिषेक पोरेड्डीवार, सुनील रणदिवे, जीवन चलाख, राजु पोटे, संतोष रेगुंडवार, तुषार ढोले, प्रमोद कडस्कर, मुकेश ठाकूर, बंडू गणविर, राजु नागापुरे, विजय पाकमोडे, पत्रुजी दंडेवार, ताराबाई चांभारे, विवेक ठिकरे, उत्तम लेनगुरे, रामभाऊ मोहुर्ले, गनेश चौधरी, अरूण पाल, प्रमोद कुंदावार, मुन्ना कोटगले, अजय थोराक, वासुदेव वाघ, विजय गुरनुले, मिथुन वाकुडकर, साईनाथ बावणे, देवीदास पिट्टलवार, गुलशन लाकडे, सचिन गुरनुले, आशु सिडाम, संजय कस्तुरे, मुक्तेश्वर शेंडे, भूमिराज भडके, नोकाजी पा. शेन्डे, सुखदेव येरमलवार, साईनाथ बावणे, गणेश कन्नाके, दिनेश ठिकरे, प्रदीप धाबेकर, ईश्वर सातपुते,गौरव मांदाडे, प्रज्वल भोयर आदींसह स्थानिक कार्यकर्ते तथा नागरिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता.