Top News

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे आज 21 कोरोना पॉझिटिव्ह.

गोंडपिपरी तालुक्यात वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या.
Bhairav Diwase. Aug 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुणाचा विळखा आणखी घट्ट होत असतानाच चंद्रपूर मध्ये व चंद्रपूर तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.

काल मिळालेल्या रिपोर्टनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 2344 झाली आहे. गेल्या 24 तासात 270 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1224 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. तर मूल येते 75 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला.

गोंडपिपरी तालुक्यात सुद्धा कोरोणाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार वढोली येथे आज 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. याआधी वढोली मध्ये 2 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव आला होता. त्यामुळे वढोली गावाची कोरोना रुग्णसंख्या ही 23 वर पोहोचलेली आहे. व गावांमध्ये रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वढोलीतील नागरिकांनी तसेच गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.

दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने