Bhairav Diwase. Aug 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गेल्या सात दिवसांपासून सततधार पाउस सुरू आहे.यामुळ वैनगंगा नदीपुलावरून आज दुपारनंतर पाणी आले.यामुळ हा मार्ग बंद करण्यात आला आहे.खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही सिमेवर पोलीसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
सात दिवसांपासून सततधार पाउस होता.त्यातच गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळ वैनगंगेला पूर आला.आज दुपारनंतर पुलावरून पाणी जाउ लागले त्यामुळ प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आष्टी चंद्रपूर हा मार्ग बंद केला आहे. 20 आॅगष्ट पासून पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच अहेरीवरून आंतरजिल्हा बसेस सुरू करण्यात आल्या होत्या.पण आता पुरामुळ पुन्हा एकदा या मार्गावरील वाहतूकीला ब्रेक लागला आहे.