हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाची प्रकृती चिंताजनक.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुकांतर्गत येत असलेल्या ‘माजरी’ येथील वेकोलीच्या खाली जाग्यावरील अतिक्रमनाच्या वादावरून माजरी ग्रामपंचायत सदस्य व त्याचा भाऊ आणि त्याचे नातेवाईकांनी मिळून बाबू उर्फ अजय यादव नामक युवकावर धारदार चाकू व तलवारीने जोरदार हल्ला चढविला. त्याला गंभीर जखमी करून जवळच असलेल्या नालीमध्ये टाकून सर्व आरोपी फरार झाले आहेत.
ही थरारक घटना आज दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास माजरी वेकोलीच्या रुग्णालयाजवळ घडली असून खुल्या जागेच्या वादात बाबू उर्फ अजय यादव नामक युवक गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार वेकोली माजरी येथील खाली असलेल्या जाग्यांवर अतिक्रमन करणे सुरू असतांना माजरीच्या एलसीएच क्वार्टर लगतच्या जागेवर बाबू उर्फ अजय यादव व त्याच्या मित्रांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले असता दि.६ सप्टेंबर २०२० रोजी माजरी ग्रामपंचायत सदस्य अमित केवट यांनी एलसीएच क्वार्टर नंबर ३८ हा माझा आहे त्यामुळे ही खाली असलेली जागा सुध्दा माझीच होणार आहे म्हणून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दोघांनीही माजरी पोलीस स्टेशन गाठले. माजरी पोलीसांनी दोघांचीही समजूत घालून अदखल पात्र गुन्हाची नोंद करुन त्यांना सोडून दिले.
त्याचदिवशी वेकोली माजरीचे सुरक्षा अधिकारी यांनी माजरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वेकोलीच्या खाली जागेवर कोणीही अवैध बांधकाम करू नये म्हणून तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेऊन माजरी पोलिसांनी सर्वांना नोटीस दिली. वेकोली माजरी जागेचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणीही अतिक्रमण करून अवैध बांधकाम करू नये असा नोटीस दिला. परंतु बुधवार दिनांक ९ सप्टेंबर २०२० च्या रात्री १२ वाजताच्या दरम्यान अमित केवट, राजू केवट व त्याचे मित्रांनी मिळून अजय यादवने केलेल्या बांधकामाची तोडफोड करून खोदून ठेवलेले गड्डे बुजवत असतांना दिसल्या कारणाने दोघांमध्ये हाणामारी झाली परंतु दोघांनीही गुन्हा दाखल होते म्हणुन आपसी समजोता केला. परंतु केवट बंधूंनी हा वाद आपसी न मिटवता आपल्या नातेवाईकाच्या मदतीने अजय यादव व त्याचा मित्र अमजीत यादव हे दोघे आज सकाळी दवाखान्यात जात असताना अडवून दवाखान्याच्या जवळच धारदार तलवार व चाकूने हल्ला केला. त्यात अजय यादव गंभीर जखमी झाला असून त्याला वेकोली रुग्णालयात नेले होते परंतु प्रकृती जास्त चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास माजरी पोलीस करित आहे.