Click Here...👇👇👇

उपचाराअभावी झालेल्या चंद्रपूरातील "त्या" दोन मृत्यूस जबाबदार कोण?

Bhairav Diwase


कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार नाहीत काय मग त्यावर उपचार करणार तरी कोण?
Bhairav Diwase.    Sep 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- सोमवार दिनांक 21 रोजी चंद्रपुरात दोन मृत्यू झाले उपचारासाठी विविध खाजगी दवाखान्यात फिरतांना केलेल्या वेळेअभावी झालेल्या दोन मृत्यू ला जबाबदार कोण असा प्रश्न आता जिल्ह्यात विचारला जात आहे. कोरोना ची स्थिती जिल्ह्यात भयावह आहे. कोरोनाशिवाय अन्य आजार होत नाही आहे कां? हा मोठा यक्ष प्रश्न आहे. अनेक खाजगी रुग्णालय आज बंद अवस्थेत आहे तर कितीतरी खाजगी डॉक्टर पॉझिटिव निघाले आहेत. अशा अन्य आजारांवर उपचार करण्यास खाजगी डॉक्टर घाबरत आहेत अशी स्थिती आज जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

सोमवार दि. 21 रोजी चंद्रपूर शहरातील शामनगर वार्डातील डॉक्टर दूधे यांना पल्स चा प्रॉब्लेम जाणवू लागला, त्यांना श्वास घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे शहरातील डॉक्टर पोद्दार, डॉक्टर आईंचवार, डॉक्टर मानवटकर, डॉक्टर नगराळे,  डॉक्टर पंत,  डॉक्टर सोईतकर,  डॉक्टर भुक्ते यांच्याकडून उपचारासाठी नेण्यात आले. यापैकी एकाही डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातचं कार्यरत असलेल्या डॉक्टर दुधे यांना बघण्यासही नकार दिला. शेवटी डॉ. दुधे यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही डॉक्टर दुधे यांना मृत्यूने कवटाळले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी हार्ट अटॅकने डॉक्टर दुधे दगावल्याचे कुटूंबियांना सांगितले. 
त्याचप्रमाणे स्थानिक भानापेठ वॉर्डामध्ये राहणारे 60 वर्षीय जगदीश पांडुरंग लाड यांचा काल एकाएक बिपी कमी झाला. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सोमवार दि. 20/09/2020 च्या रात्रो सुमारे 11 वाजतापासून त्यांच्या यांनी शहरातील खाजगी दवाखान्याची वाट धरली. डॉ Sainani, डॉ kotpalliwar,  तुकूम येथील क्राईस्ट हॉस्पिटल येथे खाक छाणल्यानंतर कुठे बेड उपलब्ध नाहीत तर कुठे डॉक्टरांनी नाकारले अशी त्यांची स्थिती झाली. शेवटी रात्री उशिरा त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय  येथे दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालय शासकीय रुग्णालयातून त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आल्यामुळे नागपूरला जातेवेळी बरोबरच्या जवळपास त्यांच्या काल सकाळी नऊ वाजता मृत्यू झाला.
काल शहरांमध्ये घडलेल्या या दोन्ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून जिल्ह्यातील आरोग्य विभागाची अवस्था दर्शविणारा आहे. दोन्ही रुग्ण उशिरा उपचारामुळे दगावले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जिल्ह्यामध्ये कोरोना स्थिती उद्भवल्यानंतर अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी कुणाकडे जावे ही स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात रोज पालकमंत्र्यांच्या कडून नविनविन योजना, सूचना, निर्देश, सल्ले मिळत आहे. परंतु त्यावर खरेच अंमलबजावणी होत आहे कां? याचे वरील दोन्ही घटना बोलके उदाहरण आहे. जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, आरोग्य विभाग व शासन यांचा आपसी समन्वय नसल्याचे हे प्रतीक आहे. यानंतर कोणताही रुग्ण उपचाराअभावी दगावू नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे दगावले या दोन्ही रुग्णांना कोरोना ची बाधा नव्हती. उपचार उशिरा मिळाल्यामुळे हे रुग्ण दगावल्याची त्यांची कुटुंब करीत आहे.