माजी पंचायत समिती सदस्य यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीत केला प्रवेश.

Bhairav Diwase
ऐन दिवाळीत कॉंग्रेसला खिंडार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- स्वातंत्र्योतर काळापासून काॅग्रेस सोबत राहीलेल्या राजुरा तालुक्यातील महत्त्वपुर्ण असलेल्या देवाडा येथिल माजी उपसरपंच तथा राजुरा पंचायत समिती चे माजी सदस्य अब्दुल जमिर अब्दुल हमीद यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आज (१५ नोव्हेंबर) दिवाळीच्या मुहूर्तावर गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश करून पक्षाला दिवाळी ची बंफर भेट दिली आहे. अ.जमिर व समर्थकाच्या पक्ष प्रवेशामुळे राजुरा तालुक्यासह विधानसभा क्षेत्रात नव चैतन्य आले असून विजयाच्या दृष्टीने भक्कम होतांना दिसत आहे.
                 अ.जमिर अ. हमिद यांचे देवाडा येथील निवासस्थानी झालेल्या छोटेखानी प्रवेश समारंभात गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेश अध्यक्ष तथा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार गोदरू पाटिल जुमनाके यांनी पुष्पहार व पिवळा दुपट्टा घालून समर्थकांसह त्यांचे स्वागत करून पक्ष प्रवेश देण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक पांडुरंग जी जाधव होते. प्रमुख उपस्थिती गोंगपा जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी, अल्पसंख्याक समाज तालुका अध्यक्ष शेख मेहबूब भाई, गोंगपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुनिरभाई शेख, जिवती पं.स.चे पहीले सभापती भिमराव जी मेश्राम, माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ममताजी जाधव, मेजर बंडूजी कुमरे, संजय सोयाम, वाघुजी उईके, पाटणचे प्रतिष्ठित नागरिक फारूख भाई, गंगु पाटील कुमरे, नारायण मोगिलवार, अरूणजी उदे, गुलाब आरके, लक्ष्मण कुळसंगे, ज्ञानेश्वर आत्राम, प्रकाश शेडमाके, लक्ष्मण चिकराम, नानाजी मडावी, संदिप पंधरे, प्रविण मडचापे, हनमंतू बावणे, बंडू नैताम, संकेत कुळमेथे हजर होते.
                       प्रवेश समारंभात अ.जमिर अ.हमिद यांचे सोबत जहीर भाई, माजी सरपंच माणिकराव कुळसंगे, जुबेर शेख, शंकर मडावी, विष्णु घुले, सलीम शेख, आशिफ शेख, प्रभाकर चेनुरवार, आनंदराव गेडाम, शंकर मेश्राम, कारू पाटील कोडापे, महेशजी बल्लावार, अकबर चाऊस, राकेश ठेंगरे, शिवाजी, रजनिकांत जेरगेवार, अ.माजीद अ.मजिद, संतोष आत्राम, प्रकाश वैरागडे, कारू बारीकराव आत्राम, प्रमोद ठेंगरे, वसंत बुटले, सुभाष शेंडे, विशाल मेश्राम, राजेश मेश्राम यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टी त प्रवेश केला.
           देवाडा परिसरातील विविध पक्षातील लोक येत्या काही दिवसांत गोंगपा त प्रवेश करनार असून त्यांच्या पक्ष प्रवेशाचा व स्वागताचा समारंभ विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर व कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालेल्या नंतर देवाडा येथे आयोजित करणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.
    या वेळी गोदरू पाटिल जुमनाके, पांडुरंग जाधव, बापुराव मडावी, शेख मेहबूब,वाढू उईके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकेतून व पक्ष प्रवेशा नंतर अ.जमीर यांनी काॅग्रेस सोडण्या मागणी आपली भूमिका मांडली. संचालन बापुराव मडावी यांनी तर आभार ज्ञानेश्वर आत्राम यांनी मानले.