महाराष्ट्रात सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे खुलने हे भाजपा च्या सर्व कार्यकर्त्यांच्या लढ्याला मिळालेल यश:- भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 16, 2020


बल्लारपूर:- आजपासून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ठिकाणी सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे खोलण्याची महाराष्ट्र सरकारने अनुमती दिली गेल्या अनेक महिन्यांपासून देशात लॉकडाऊन होते नंतर हळूहळू कोरोना महामारीचे रुद्र रूप कमी झाले आणि लोकांची रहदारी सुरू झाली अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्स, मार्केट, रेस्टॉरंट त्याच प्रकारे अन्य सर्व दुकाने खोलण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारने दिला परंतु भारत सरकारने मंदिर खोलण्याचा आदेश देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकार प्रार्थनास्थळे न करण्याचा हट्ट करुन बसले होते. अशावेळी या झोपलेल्या सरकारला जागे करण्याकरिता महाराष्ट्राचे लोकनेते मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांच्या मार्गदर्शनात व भाजपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या व भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व तळागाळातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात ठीक ठिकाणी घंटानाद आंदोलन केले.


 आज या सरकारला जाग आली आणि त्यांनी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुले करण्याची अनुमती दिली खरतर हा भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या लढ्याला मिळालेला विजय आहे. या विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरिता बल्लारपूर शहरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा च्या माध्यमातून ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, नगराध्यक्ष हरीशजी शर्मा, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिषजी देवतळे व शहर अध्यक्ष काशिनाथजी सिंग यांच्या नेतृत्वात डब्ल्यूसीएल एरियातील हनुमान मंदिर मध्ये पूजा अर्चना करून सर्व कार्यकर्त्यांना लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी नगरसेवक येल्लैय्याजी दासरफ, भाजयुमो शहर सचिव संजय बाजपेयी, युवा नेते शिवाजी चांदेकर रामेश्वर पासवान, आदित्य शिंगाडे, पियुष मेश्राम, प्रकाश दोतपेल्ली, अभिषेक सातोकर, प्रेम यादव, कृष्णा गुप्ता, प्रचलित धनरे प्रतीक धनरे, राकेश मडावी, प्रेम भगत,वैभव येसंकर, प्रवीण मडावी यांची उपस्थिती होती.