गुगल, युट्युब आणि जीमेलसह गुगल च्या सर्व सेवा झाली होती ठप्प.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.   Dec 14, 2020
इंटरनेटच्या महाजालातील सर्वाधिक लोकप्रीय सर्च इंजिन असलेल्या 'गुगल'मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे.

डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा डाऊन झाल्या होत्या. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात अडचण नेटिझन्सना अडचण येत आहे. दरम्यान, 'गुगल'कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.