दुचाकीच्या अपघातात एक ठार.

सातारा तुकुम गावाजवळील घटना.
Bhairav Diwase.   March 25, 2021
पोंभुर्णा:- गोमपाटिल तुकुम येथुन चंद्रपूर येथे जात असताना दुचाकिचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दिनांक २३ मार्च रात्रौ ९ वाजताच्या सुमारास सातारा तुकुम गावाजवळ घडली.
 
        मृतकाचे नाव आकाश मडावी वय ३५ असुन तो गोमपाटिल तुकुम येथील रहिवासी आहे. अपघातानंतर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन करण्यासाठी त्याला चंद्रपुर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढिल तपास उमरी ठाणेदार  कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने