कोरोनाला दैवीचा कोप समजून गावाने देवीला घातले साकडे.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. May 07, 2021
चामोर्शी:- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आणि गावात तापाची साथ सुरू असताना गावकऱ्यांनी देवीला साकडे घालत आरोग्य विभागाच्या तपासणीला नकार दिला. गावकऱ्यांच्या या अंधश्रद्धेपुढे आरोग्य विभागाचे पथकही हतबल झाले आहे. हा प्रकार जैरामपूर या गावात घडला.

गावात आठवडाभरापासून बहुतांश लोकांना ताप आला असल्याने हा दैवी प्रकोपच असावा, या समजापोटी गावकऱ्यांनी देवीला साकडे घालण्याचे ठरवले. या परिसरातील गावखेड्यात संकटकाळात माऊलीला (देवी) पाणी घालण्याची प्रथा आहे. त्यानुसार गावातील महिलांनी नदीवरून कळशीत पाणी भरून वाजतगाजत आणून माऊलीला पाणी अर्पण केले. दोन, पाच, किंवा सात दिवस माऊलीला पाणी अर्पण केले म्हणजे ताप जातो, अशी या लोकांची समजूत आहे.

सध्या कोरोनाचे रुग्ण अनेक गावांत पसरले आहेत. तरीही हा ताप कोरोनाचा नाही अशी गावकऱ्यांची समजूत आहे. हा प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंबोरकर यांनी सांगितले.



अंधश्रद्धेपुढे आरोग्य विभागाचे पथकही हतबल झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असाच प्रकार पाहावयास आणि ऐकाला मिळत आहे. गावातील लोक अंधश्रद्धा पाळत असुन आरोग्य विभागाला एक प्रकारचा ठेंगा दाखवला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला असून तापाची साथ सुरु आहे. काही लोक तपासणी ला सामोर जात नसल्याने गावात कोरानाचे रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात सकाळच्या सुमारास वाजत-गाजत एक प्रकारची मिरवणूक काढली जाते. व माऊलीला पाणी अर्पण केले जात आहे. यांच्याकडे तालुका प्रशासन व आरोग्य विभागानी गावात सकाळच्या सुमारास फेरफटका मारून नेमका हा प्रकार काय? यांच्या कडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

अंधश्रद्धेला बळी न पडता तपासणीला समोर जावे. असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.