डॉ. दीक्षितांच्या श्वेता हॉस्पिटलवर मनपाची कारवाई.

Bhairav Diwase
मनपाने कोविड केअर सेंटर ची मान्यता केली रद्द.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- शासनाने ठरवून दिलेल्या दारांपेक्षा पेक्षा अधिक दर आकारणी करून कोविड रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या चंद्रपूर शहरातील डॉ. रितेश दीक्षित यांच्या श्वेता हॉस्पिटल च्या कोविड केअर सेंटर ची मान्यता परवानगी गुरुवारी मनपा प्रशासनाने रद्द कारवाई केल्याने शहरातील वैद्यकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले, शहरापासून गावाखेड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. रुग्णांना वेळेत उपचार मिळावा याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयांना कोरोना उपचार करण्याची परवानगी दिली. त्यानुसार श्वेता हॉस्पिटल ला सुद्धा परवानगी देण्यात आली होती.


डॉ. रितेश दीक्षित हे कोविड रुग्णांवर उपचार करीत होते. काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या अधिकची रक्कम घेण्यात येत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असता जिल्ह्यात सर्वत्र टिकेची झोड उठली होती.त्यानंतर डॉ. दीक्षित व रुग्णांच्या नातेवाईकांत झालेली खडजंगी ही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.