Top News

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या तर्फे नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटाइझर मशीन भेट.

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीला यश.
Bhairav Diwase. May 15, 2021
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आटोमॅटिक सॅनिटाइझर मशीन उपलब्ध करण्यात आलेली आहे.करीता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती.त्याअनुषंगाने मागणीची दखल घेत तात्काळ आटोमॅटिक सॅनिटाइझर मशीन उपलब्ध करून दिली.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सॅनिटाइझर मशीनचे लोकार्पण नारंडा ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुताई ताजने यांच्या हस्ते करण्यात आले,व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंबे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून आशिष ताजने,डॉ.दीक्षा ताकसांडे उपस्थित होत्या.

         नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाच्या काळात अनेक नागरिक लसीकरण घेण्यासाठी  येत आहे,पंरतु आरोग्य केंद्रात सॅनिटाइझर मशीन नसल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता,या सर्व बाबीची दखल घेत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सॅनिटाइझर मशीन उपलब्ध करण्याबाबत मागणी केली व त्यांनी तात्काळ सॅनिटाइझर मशीन उपलब्ध करून दिली.
             
    यावेळी माजी सरपंच वसंता ताजने,सत्यवान चामाटे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली भोंगळे,रंजना शेंडे,शालिनी हेपट, बापुराव सिडाम,सुरेश शेंडे उपस्थित होते. सॅनिटाइझर मशीन उपलब्ध केल्याबद्दल सर्व नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने