स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पिट्टीगुडा व पाटण पोलिसांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली व्दारे जनजागृती #jiwati

Bhairav Diwase


जिवती:- स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन पोलिस स्टेशन पाटण व पिट्टीगुडा यांची शहरातुन तिरंगा रॅली काढण्यात आली यात पाटण व पिट्टीगुडा चे पोलिस कर्मचारी माध्यमिक आश्रम शाळा पिट्टीगुडाचे विद्यार्थी आर्या दि बेस्ट युनियन पोलिस भर्ती पुर्व प्रशिक्षण केंद्र पाटणचे प्रशिक्षणार्थी ग्रामपंचायत पदाधिकारी प्रतिष्ठीत नागरीक यांच्या प्रमुख उपस्थितीत हातात झेंडा घेऊन सहभागी झाले होते.
देशभक्तीवर जय घोषणांनी पिट्टीगुडा व पाटण शहर दुमदुमून निघाले रॅलीला सुरुवात पिट्टीगुडा येथुन करण्यात आली तर पाटण या शहराला वळसा घालुन पोलिस स्टेशन पाटण येथे आल्यानंतर देशभक्तीवर गीत गायणाचा व मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला या वेळी पिट्टीगुडा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शरद आवारी माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील मडावी डाॅ.पंकज पवार माजी उपसरपंच भिमराव पवार सिताराम मडावी पोलिस कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत होते