Top News

रामाळा तलावातील मासे काढण्यासाठी 45 दिवसांचा अवधी #chandrapur


महानगर भाजपाच्या पुढाकाराने मच्छीमारांना मिळाला अवधी

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील रामाळा तलावातील मासे जिल्हाधिकाऱ्यांनी या पूर्वी 30 दिवसांचा कालावधी मच्छीमारांना दिला होता. पण आता 45 दिवसांचा अवधी मच्छीमारांना दिला होता. हा कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी मच्छिमारांनी केल्यावर महानगर भाजपाने पुढाकार घेत भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत, निवेदन सादर केले.

यावेळी माजी उपमहापौर राहूल पावडे, दतप्रसन्न महादणी जी, भाजपा नेते राकेश बोमनवार, निमेश आकेवार व मच्छिमार बांधव संतोष झा, शंकर गुमलवार, किशोर मंचलवार, रमेश रामगुंडवार, राजू गुमजवार, सुनील मंचलवार, रवी मंचलवार यांची उपस्थिती होती.

सद्या स्थितीत रामाळा तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम जिल्हाप्रशासनासने हाती घेतले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारातून या तलावाचे सौंदर्यीकरण होत आहे. जिल्हा प्रशासनाने हा तलाव एका महिन्यात संपूर्ण पाणी काढून कामाला सुरुवात करण्याचे जाहीर केल्याने मच्छीमारांसमोर अडचण निर्माण झाली. तलावातील मासोळ्या फारच छोट्या असून 30 दिवसात तलाव रिकामा केला तर त्याचा आर्थिक भुर्दंड मच्छिमारांना सहन करावा लागेल याकडे डॉ मंगेश गुलवाडे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे लक्ष वेधल्याने त्यांनी 15 दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे.जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचे आता कौतुक केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने