अन् बस थांब्यावरच त्याने प्राशन केले विष! #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase


पोंभुर्णा:- बेंबाळ पोलिस दुरक्षेत्रच्या हद्दीतील नांदगाव बस स्टँड दरम्यान एका युवकाने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. धिरज रामचंद्र देवनपल्लीवार (२९) रा. गोवर्धन (मुल) असे युवकाचे नाव असुन प्रकृती गंभीर असल्याने पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन चंद्रपूर येथे हलविण्यात आलेले आहे.
सदर युवक विवाहित असुन दोन मुले पत्नी व आई-वडील असा परिवार आहे. तो एका रिश्तेदाराच्या अंतिमसंस्कार साठी गेला होता. परत येताना नांदगाव बस स्टँड वर विष प्राशन केल्याचे समजताच लागलीच उपचारासाठी हलवीले. वु्त लिहेपर्यत नेमके कारण समजलेले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.