Chandrapur Bus Accident : चंद्रपूर जिल्ह्यात दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात #chandrapur

Bhairav Diwase
मूल:- चंद्रपूर व मुल वरून येणाऱ्या एमएसआरटीसी च्या दोन्ही बसेस एकमेकांना समोरासमोर आदळून भीषण अपघात चिचपल्ली जंगलात घडल्याची घटना समोर येत आहे. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसून प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघात इतका भीषण होती की बस समोरून पूर्ण चकणाचुर झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती आहे. दोन्ही बसेस खूप जास्त वेगात असल्यामुळे ड्रायव्हर चे नियंत्रण सुटून हा अपघात घडून आला. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून महामंडळाच्या ड्रायव्हर ने डोळे उघडे ठेऊन गाडी चालवावी असे बोलू लागले. एका बस मध्ये ३० ते ४० प्रवासी व बस कंडक्टर प्रवास करतात या सगळ्या प्रवाशांची जबाबदारी हि ड्रायवर असते जर या ड्रायव्हर कडून अश्या चुका घडतील तर प्रवाशांचा काय होणार असा प्रश्न नागरिक करू लागले.

एमएसआरटीसी च्या बसेस चा प्रवास सुरक्षित असल्यामुळे नागरिक जास्त पसंती या बस ला देतात पण या घटनामुळे एमएसआरटीसी महामंडळ चर्चेत आले आहे असे दिसून येते.